बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे बारामतीत पंचायत समितीसमोर दिव्यांग बांधवाकडून लाडू वाटत फटाके वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला.या स्वतंत्र मंत्रालयाचा फायदा दिव्यांगाना होणार असल्याचे प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष मृत्युंजय सावंत यांनी सांगितले.दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं.३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिना दिनानिमित्त स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू गेली २५ ते २६ वर्षे लढा देत असून,त्याला आता यश आलं आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठी स्वाधार योजना, गाडगेबाबा घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे.तसेच मुकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम मिळावं यासाठी प्रयत्न केलेल जाणार आहेत.येत्या १५ दिवसांत हे शासन मंत्रालय स्थापन करणार असून दिव्यांग मंत्रालय हा देश पातळीवरील मोठा निर्णय असल्याचे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून,यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आभार मानले.