बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
हर हर महादेव चित्रपट संदर्भात सिनेमा गृहात जाऊन प्रेक्षकांना मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक योग्य आहे.माजी मंत्री असो वा आमदार असो कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.आणि कोणाच्या तरी सार्वभौम हक्कावर गदा आणण्याचा अधिकार तर अजिबातच नाही.शेवटी आपल्या राज्यात आणि देशात कायदा आहे. त्या अनुषंगाने सेन्सॉर बोर्डाने अभ्यास करूनच चित्रपटासाठी परवानगी दिली असावी.आणि यावेळी आम जनतेने चित्रपट पाहायला गेल्यावर त्यांना मारहाण करणं हे कोणत्या कायद्यात बसत.असा सवालही शिंदेंनी आव्हाडांना केला.
आणि मग जरी कोणी कोणाला मारणार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारचं…शेवटी राज्य कायद्याचं आहे.वात्रट आणि वाचाळ बोलण्याची सवय आहे.हा स्टंट आव्हाडांच्या अंगलट आला आहे.याच्यातून ही अटकेची कारवाई झाली आहे ते यांच्यातून सुधरतील अशी माझी भावना आहे असा मिश्किल टोला आमदार राम शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. यावेळी ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.