बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
भाजप नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत.विशेष म्हणजे सीतारामन दीड महिन्यांपूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या, त्यानंतर आता पुन्हा त्या तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत.निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल आज आणि उद्या बारामती दौऱ्यावर आहेत.
आज मंत्री पटेल यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील पाच गावांमध्ये भाजप शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सीतारामन यांच्या मागच्या दौऱ्यापेक्षा यावेळचा दौरा खूप मोठा आणि आकर्षक करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.या दौऱ्यात भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.यावेळी केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजपचे नेते बारामती लोकसभाप्रमुख आमदार राम शिंदे,हर्षवर्धन पाटील , भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,जिल्हा उपाध्यक्ष ऍड.गोविंद देवकाते,बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,शहराध्यक्ष सतीश फाळके, युवा मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.