BARAMATI NEWS : बारामती तालुक्यातील सायकल क्लबचा अनोखा उपक्रम;सायकल यात्रेद्वारे अष्टविनायक यात्रा करत दिला पर्यावरण जागृतीचा व मुलगी जगवा मुलगी वाचवाचा संदेश..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकांची महती सांगावी तितकी कमीच आहे.आणि याच अष्टविनायकापैकी बारामती तालुक्यातील मोरया तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगावातील मोरया सायकल क्लब यांनी सायकल मोरगाव ते मोरगाव अशी अष्टविनायक यात्रा करत तिर्थ क्षेत्रांना भेट देत सुरू केली आहे.या सायकल यात्रेत झाडे लावा-झाडे जगवा,मुलगी जगवा मुलगी वाचवा,शरीर स्वास्थ्य टिकवा याबाबत सामाजिक संदेश देत जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम मोरया सायकल क्लबने केला आहे.या सायकलवारीत त्यांना भेटलेल्या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालविण्याचे महत्व पटवून दिले.मोरया सायकल क्लबचे यंदाचे हे तीसरे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील आठ गणपती क्षेत्रातील अष्टविनायकांपैकी मोरगांवचा मयुरेश्वर,सिद्धटेकचा सिद्धिविनायक,पालीचा बल्लाळेश्वर,महाडचा वरदविनायक,थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक,ओझरचा विघ्नेश्वर,रांजणगांवचा महागणपती ही मंदिरे मोरगांव,रांजणगाव,थेऊर,लेण्याद्री, ओझर,सिद्धटेक,पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे,अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित असून या सायकल क्लबने यात्रेच्या माध्यमातून वृक्षरोपण संगोपनाची जबाबदारी घेतली असून,मोरया सायकल क्लबने आतापर्यंत एक हजार झाडं लावलेली आहेत आणि त्यांचे संगोपन करत आहेत.झाडे लावा-झाडे जगवा,मुलगी वाचवा,आरोग्य संभाळा असे विविध स्तुत्य उपक्रमातून सामाजिक संदेश देत आहेत.

हे सायकलस्वार ६०० कि.मी.चे अंतर चार दिवसात पूर्ण करतात. आणि मोरगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात येतो.या उपक्रमात मोरया सायकल क्लबचे सदस्य, सायकलस्वार विकास गुरव,नितीन तावरे ,मोहन तावरे, अंकुश तावरे सागर भोंडवे, गणेश चौधरी,डगळे सर,नाना नेवसे, विश्वजित शिंदे,ज्ञानेश्वर भापकर सुधीर कोकाटे, रोहित गुरव,कौस्तुभ वाघ,रमाकांत तावरे आदी गणेश भक्त सायकल यात्रेमध्ये सामील झाले होते.या सायकल स्वारांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *