बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून बोगसरीत्या शिपाई पदाची नियुक्ती मिळवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी निंबोडीच्या तत्कालीन सरपंच मनीषा किशोर फडतरे ( रा.निंबोडी, ता.बारामती,जि.पुणे ), ग्रामसेवक एम.एन. सालगुडे व युवराज रामहरी पवार ( रा. निंबोडी,ता.बारामती,जि.पुणे यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०,४६८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष मोहन सोनवणे,वय.४३ वर्षे ( रा.निंबोडी )यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यातील संशयित आरोपी युवराज पवार हे ग्रामपंचायत निंबोडीमध्ये २००४ पासून शिपाई म्हणुन कार्यरत आहेत.यावेळी सालगुडे हे ग्रामपंचायत निंबोडी येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते.व मनीषा फडतरे या ग्रामपंचायत निंबोड़ीमध्ये सरपंच म्हणून कार्यरत असून,यातील संशयित आरोपींनी संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणुक केली आहे.यातील संशयित आरोपी युवराज पवार हे सिध्देश्वर विकास कार्यकारी सहकारी सोसायटी निंबोडी या संस्थेमध्ये २००३ पासुन शिपाई म्हणुन कार्यरत असुन त्याने ग्रामपंचायतमधुन देखील वेतन प्राप्त करून घेतले आहे.
सन २००४ पासून पवार याने ग्रामसेवक सालगुडे व तत्कालीन सरपंच फडतरे यांच्याशी संगणमत करुन शिपाई पदाची बोगस नियुक्ती मिळवुन व एकाच वेळी दोन ठिकाणावरुन पगार मिळविला आहे. व बोगस कागद पत्राच्या सहाय्यने शासनाची फसवणुक केली आहे.या गोष्टींची माहिती असताना देखील ग्रामसेवक व तत्कालीन सरपंच यांनी बेकायदेशीर मार्गाने व स्वताचे आर्थिक हित साधत संगणमताने खोटी व बनावट नियुक्तीपत्र,हजेरीपत्र,पगारपत्रक तयार करुन पगार काढत शासनाची फसवणुक केली आहे.बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.