बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक २०२२-२७ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली होती.तर आज दि ९ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दत्तात्रय रामभाऊ आवाळे व उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब चंदरराव मोरे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध संपन्न झाली.
बारामती तालुका खरेदीविक्री संघाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली होती. त्यानंतर आज बुधवार दि.०९ रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी चेअरमन पदासाठी सावळचे दत्तात्रय रामभाऊ आवाळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब चंदरराव मोरे अंजनगाव यांच्या नावाची घोषणा या बैठकीमध्ये केली.या निवडणुकीसाठी दोन पदासाठी दोनच अर्ज आल्यामुळे सदरची निवड प्रकीया बिनविरोध झाली.