BIG NEWS : इंदापुरातील शेतात बेकायदेशीर चालणाऱ्या कत्तलखान्यावर कारवाई; शेतात आढळून आली शेकडो गायींची मुंडकी..!!


इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाचे मानद पशुअधिकारी शिवशंकर स्वामी यांनी मोहीम सुरू केले असून,इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या
कत्तलखान्याची माहिती पोलिसांना देत इंदापूर व वालचंदनगर पोलिसांनी छापा टाकून गोवंशसदृश्य जनावरांचे मांस व इतर साहित्य जप्त केले.याप्रकरणी आरिफ यासिन कुरेशी,जाकीर अब्दुल मजीद बेपारी, हाजी मस्तान जाकीर बेपारी व जागा मालक सर्वजण ( रा.इंदापुर,जि.पुणे ) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२९,३४,सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ५,५ (c),९,९ (a),९ (b), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इंदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सिद्धाराम रामन्ना गुरव ,वय.३१ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत इंदापुर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,इंदापूरातील तरंगवाडी येथील कत्तलखान्यात शेकडो जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती शिवशंकर स्वामी यांनी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती.त्यानुसार इंदापूर पोलिसांनी इंदापूर पशुसंवर्धन विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अनिल तांबे यांना सोबत घेत घटनास्थळी जात पाहणी केली असता,तरंगवाडी येथे इंदापूर बारामती रोड लगत दक्षिण बाजूला एक किलोमीटर अंतरावर दाट झाडी झुडपांमध्ये गुरांची कत्तल केली गेली होती.

तेथे पाणीसाठा करण्यासाठी तळे,जनावरे कापण्यासाठी सिमेंटचा कोबा,दोन इंजिन असलेल्या लोखंडी मशीन व जनावरांचे रक्ताचे डाग आणि प्लास्टिकच्या टिपाडात आतडी साठवलेली दिसली.तसेच बाजूच्या मोकळ्या जागेत काही जनावरे देशी, गिर व जर्सी गाई,बैल,वासरे कापून त्यांची मुंडकी,पाय,धड, शिंगे,कातडी काढलेल्या अवस्थेत त्यांना मांस चिटकलेले हाडे दिसली.येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.सहाय्यक आयुक्त डॉ. तांबे यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी काढून घेतले. दरम्यान या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोल खड्डा खोदून त्यामध्ये ते गोवंशसदृश्य मांस नष्ट करण्यात आले.ही कारवाई इंदापुर व वालचंदनगर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *