बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी सर्वोच्च भाषा वापरल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यावरच राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहे. त्याच विधानावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी कृषीमंत्री यांना टोला लगावत वक्तव्याचा निषेध केला आहे.
राज्यभर सत्तारांचा निषेध होत असताना आता रोहित पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत,सत्तारांवर निशाणा साधला कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही.महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं? असा सवाल उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक ‘बदला’ घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात.आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या.राज्यपालांनी देखील सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत सुद्धा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले. त्याचा निषेध सत्तेत असणाऱ्या लोकांनी कोणीही नाही केला. त्यामुळे अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणार असतील.आणि अशा थोर व्यक्ती असतील नाहीतर एखादे नेते असतील त्यांच्या विरोधात बोलणार असतील तर आम्ही राजकारण करत असलो तर आम्ही निषेध करतो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता देखील निषेध करीत असल्याचे रोहित पवारांनी नमूद केले.