बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बिल गेट्स यांचे संकल्पनेतून मायक्रोसॉफ्ट वा कंपनीने कृषी क्षेत्रावर आधारित संशोधन प्रकल्प विकसित करण्याचे पाउल उचलले आहे.यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फार्म (Farmvibes.ai) या संशोधन प्रकल्पासाठी गुणवत्ता केंद्र बारामती येथे असेल जे मो संशोधन संघ,ऑक्सफर्ड विद्यापीठातील अर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स ऑफ अधिक टेक्नॉलॉजी आणि क्लायमेट चेंज कोर्सचा उपक्रम राबवणारे डॉ.अजित जावकर आणि त्यांचा संघ सोबत काम करणार आहेत. असे कृषी संधोधन केंद्राची निर्मिती मायक्रोसॉफ्ट या कंपनीने युनायटेड स्टेट मधील वॉशिंग्टन येथे केली आहे.
आणि भारतासाठी अभिमानास्पद म्हणजे वॉशिंग्टन नंतरचे दुसरे सेंटरची निर्मिती करण्यासाठी भारतातील अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेची निवड केली असल्याचे रिसर्च फॉर इंडस्ट्री नेटवर्किंग रिसर्च व्यवस्थापकीय संचालक, आणि मायक्रोसॉफ्टचे अॅग्री फूडचे सी टी ओ डॉ. रणवीर चंद्र यांनी या अधिकृत घोषणा केली आहे.प्रोजेक्ट Farmvibes.al हा मायक्रोसॉफ्ट रिसर्च मधील शेती केंद्रित तंत्रज्ञानाचा एक नवीन संच आहे. मायक्रोसॉफ्टने अलीकडेच ही साधने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. जेणे करून संशोधन, डेटा शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी यांना कृषी क्षेत्रातील माहिती मध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते. या प्रकल्पातील मशीन लर्निंग अल्गोरिदम तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे सुपीकता वाढवणे, उत्पादन वाढ करणे, पिक पद्धती नियोजन करणे, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्ता वाढ करणे आणि त्या मागील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते.
Microsoft Azure या प्लॅटफॉर्मवर चालणारे Farmvibes.al अल्गोरिदम, जमिनीतील सेन्सर्स, आकाशातील ड्रोन आणि अवकाशातील उपग्रह यांच्यामार्फत माहिती गोळा करून “भविष्यातील अत्याधुनिक शेती’ तयार करण्यासाठी जगभरातील विविध घटकाला सक्षम करू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्याच्या शेतात योग्य प्रमाणात खत पाणी व्यवस्थापन आणि तणनाशक वापरू शकतो आणि त्याच्या शेतातील तापमान आणि वाऱ्याच्या वेगाचा व पावसाचा अंदाज लावू शकतो तसेच याद्वारे त्याच्या शेतीचे उत्पादन वाढवू शकतो. फार्म वाइब्जचा वापर करून, शेतकरी हवामानातील बदल आणि अन्नसुरक्षा यांसारख्या मोठ्या आव्हानांना पद्धतशीरपणे सामोरे जाऊ शकतो. विशेषत: Farmvibes.ai मध्ये पुढील नाविण्यपुर्ण संशोधनाला चालना मिळणार आहे.
Async Fusion, याद्वारे तात्कालीक ज्ञानासाठी ग्राउंड आधारित सेंसर च्या डेटासह ड्रोन आणि उपग्रह प्रतिमा एकत्र करतात.SpaceEye याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उपग्रह प्रतिमांच्या दरम्यान येणारे ढग दूर करतात.Deep MC: यामध्ये सेन्सर डेटा आणि हवामान केंद्रातील माहितीनुसार शेतीतील तापमानातील सूक्ष्म बदल आणि वाऱ्याच्या गतीचा अंदाज ठरवण्यात येतो.
“what if” हे विश्लेषण साधन विविध शेती पद्धतींचा जमिनीमध्ये टाकलेल्य प्रमाणात कसा परिणाम होईल याचा अंदाज लावते.
भारतासारख्या देशात”What if” या विश्लेषण साधना सारखी साधने सामान्य शेतकऱ्यांना आणि विशेष करून लहान होती धारकांना वेगवेगळ्या परिस्थितीमुळे पिकांवर परिणाम करणारे धोके कमी करण्यासाठी मदत करू शकतात व त्यांना सक्षम करू शकतात.
परस्पर सहकार्याने कार्य करून अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT), अटल इंक्युबेशन सेंटर बारामती मायक्रोसॉफ्टच्या रिसर्च टिमसोबत आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील AI ची टीम Farmvibes.ai वर मुक्त स्रोत उपाय तयार करू शकतात जे भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्व शेतकरी यांच्यासाठी उपलब्ध केले जाऊ शकतात.याव्यतिरिक्त, इंजिनिअरिंग, कृषी जैवतंमज्ञान,आय.टी,सायन्सच्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असणारे Farmbeats हा प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकत्र करून डेटा आधारित आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शेती करण्यासाठी प्रेरित करू शकतात. या नवीन तंत्रज्ञानाने उभा केलेल्या काही सामाजिक आणि नैतिक आव्हानांमध्ये विद्यार्थ्यांना नाविण्यपुर्ण संधी उपलब्ध करणेकामी मोलाचे ठरू शकेल.
या घोषणेप्रसंगी आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाऊड अँड एज इम्प्लिमेंटेशन, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कोर्स डायरेक्टर अजित जावकर, मायक्रोसॉफ्ट चे रिसर्च प्रिन्सिपल रियान पिशोरी यांच्या उपस्थितीत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमे ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार आणि चेअरमन राजेंद्र पवार,विश्वस्त सुनंदा पवार,राजीव देशपांडे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलेश नलावडे यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.