मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना शिंदे आणि ठाकरे गटातील नेते तसेच इतरही पक्षांचे नेते पातळी सोडून बोलताना दिसत आहे.यामुळे राजकारणाचा घसरलेला दर्जा नक्की काय काय ऐकायला लावणार आहे,असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेकडून विचारला जात आहे. शिवसेना फुटीनंतर राज्यात खोक्यांवरुन चांगलेच राजकारण रंगले आहे.विरोधकांकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर खोक्यांचा आरोप करत आहेत.
सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर टीका करताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली आहे.एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला.यावेळी सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.झाले असे की, सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, असे उत्तर दिले.
यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ माजली असून अब्दुल सत्तारांवर टीका करण्यात येत आहे. तर, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारला त्यांचे मंत्री अडचणीत आणत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अब्दुल सत्तरांबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.