श्रवणयंत्रासाठी तीन दिवशीय शिबिरात ६५५ नागरिकांची तपासणी


बारामती महाराष्ट्र टुडे न्यूज नेटवर्क :


उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष प्रयत्नांतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरूप फाउंडेशन मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि ठाकरशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कानाच्या श्रवणयंत्र मशीनसाठी मोजमाप पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी करण्यात आले होते.तीन दिवसीय कानाचे मोजमाप तपासणी शिबिरात एकूण सहाशे पंचावन्न नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणी शिबिराचा समारोप आज करण्यात आला.
तपासणी झालेल्या सर्व पात्र नागरिकांना दीड महिन्यानंतर श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली


कानांची मोजमाप तपासणी स्वरुप फाऊंडेशन च्या डॉक्टर्स स्टाप ने केली तर मदत व सहकार्य शारदानगर नर्सिंग स्कूल मधील विद्यार्थिनींनी केले.यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,बारामती संजयगांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक,बारामती तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहायक नितीन सातव,बारामती यशस्विनी सामाजिक अभियान सहसमन्वयिका दिपाली पवार,नितीन काकडे,निलेश जगताप आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *