पै.सिकंदर शेख यांनी जिंकली अडीच लाखांची पहिली कुस्ती..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील झारगडवाडीत ग्रामस्थांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला होता. यात पहिली कुस्ती अडीच लाख रुपयांची पै.सिकंदर शेख विरुद्ध पै.मनजीत खत्री, दुसरी कुस्ती दीड लाख रुपयांची पै. बाला रफिक शेख, विरुद्ध महारूद्र काळे विरुद्ध संतोष जगताप तर तिसरी कुस्ती चाळीस हजार रुपयांची पै. मोईन पटेल, विरुद्ध पै.अभिषेक देवकाते यांच्यात रंगली. अश्या एकूण छोट्या मोठ्या अडीचशे कुस्त्या झारगडवाडीच्या कुस्तीच्या आखाड्यात पार पडल्या.
झारगडवाडीत ( बारामती ) पहिल्याच वर्षी कुस्तीचा आखाडा रंगला होता यामध्ये पहिली कुस्ती ही अडीच लाख रुपयाची ठेवण्यात आली होती ही कुस्ती पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान मनजीत खत्री यांच्यात रंगली यामध्ये पापणी लावायच्या आतच पैलवान सिकंदर शेख याने विरुद्ध लढत असलेल्या पैलवानाची पायाची मुळी बांधत क्षणात चितपट करत झारगडवाडी तील कुस्ती आखाड्यातील पहिली कुस्ती जिंकत झारगडवाडी करांची मने जिंकली आहेत.
झारगडवाडीत कुस्तीचा आखाडा हा पावसामुळे वारंवार रद्द होत होता मात्र त्यांनी माझ्या वेळेनुसार पुन्हा कुस्तीचा आखाडा ठेवला. मला येते येऊन फार आनंद झाला त्याबद्दल मी झारगडवाडी करांचे मनापासून आभार मानतो. नवीन पहिलवानांनी जिद्द आणि चिकाटी ठेवत कुस्तीवर मेहनत घेतली पाहिजे यात यश नक्कीच येते असा मोलाचा सल्ला झारगड वाडी कुस्ती आखाड्याचा मानकरी ठरलेल्या पैलवान सिकंदर शेख यांनी नवीन कुस्ती पहिलवानांना दिला आहे.