यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.यश भारत शिंदे,वय. १९ वर्षे ( रा. शिंदवणे,ता.हवेली,जि.पुणे ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत यवत पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असून,स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठवड्यात या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यवत पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातीलआरोपीचा शोध घेण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे यवत पोलीस स्टेशन हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,यवत येथील घर फोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बोरी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली,असता त्याठिकाणी सापळा रचत संशयित आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता,त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करून तो वापरत असलेल्या मोबाईलची पाहणी केली असता गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल असल्याची खात्री झाल्याने त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते दौंड पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक सिदपाटील पोलीस अमंलदार सचिन घाडगे,अजित भुजबळ,विजय कांचन,अजय घुले,पोलीस कर्मचारी,धिरज जाधव यांच्या पथकाने केलेली आहे.