BIG NEWS : राज्यातील १७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यातील गृहमंत्रालयाने पोलिसांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १७५ वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधित वरिष्ट पोलीस निरीक्षकांना आता सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी देण्यात येणार आहे. सोबतच त्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या विविध पोलीस विभागातील ५७ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान मुंबईमधील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्यातील अनेकांची बदली न करता त्यांना मुंबईमध्येच ठेवण्यात आले आहे.आता लवकरच या अधिकाऱ्यांना त्यांची नवीन जबाबदारी मिळणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात आली राज्यातील १७५ वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. ज्या पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्यांच्याकडे आता सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वोपवण्यात येणार आहे. यामध्ये मुंंबईमधील ५७ जणांचा समावेश असल्याचे गृहमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पदोन्नती मिळालेल्या पोलीस अदिकाऱ्यांमध्ये मुंबईतील शाम शिंदे,साहेबराव सोणवने,शरद ओवले,दिनकर शिलांवत,सुधीर करलेकर,जयंत परदेशी, किशोर गायक, सुहास हेमाडे,सुनिल घुगे,धर्मपाल बनसोडे,हरिष गोस्वामी दीपक निकम,संजय जगताप,राजू कसबे यांच्यासह ५७ जणांचा समावेश आहे. लवकरच त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *