बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीच्या भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एकावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेत एकजण गंभीररित्या जखमी झाला असून त्यास बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे आणि पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
बारामती गोळीबार झाल्याने संपुर्ण पुणे जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश जाधव,वय.३० वर्षे,( रा. तांदुळवाडी,ता.बारामती,जि.पुणे ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास गणेश जाधव हे भिगवण रोडवरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे.गोळी गणेश जाधव यांच्या पोटाच्या खाली लागली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अद्याप गोळीबाराचे ठोस कारण समोर आलेले नाही.