सिद्धेश्वर निंबोडी तलावात सोडलेले बारामती ऍग्रोचे दुषित पाणी बंद न झाल्यास करणार आमरण उपोषण करणार: सुरज सवाणे..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती ऍग्रो साखर कारखाण्याचे दुषित रसायनिकयुक्त पाणी हे उघडयावर राजेरोसपणे सोडले गेलेलं आहे त्या दुषित पाण्याची कोणत्याही प्रकराची काळजी न घेता हे पाणी बंदिस्त स्वरूपात नसून उघडयावर दोन ते तीन किलोमीटर असच बेवारस सोडलं गेलेलं आहे. या दुषित पाण्याचा इतका ऊग्र व दुर्गंधीयुक्त वास येत असून, आता नागरिकांना सिद्धेश्वर निंबोडी ते शेटफळगडे या रस्त्याने प्रवास करणं धोकादायक व आरोग्याला हानिकारक झाला आहे.

एवढंच नव्हे तर संबंधितांनी निष्कळजीपचा कळस गाठला आहे हे पाणी थेट निंबोडी येथील सार्वजनिक तलाव आहे.त्या तलावाच्या पाण्याचा वापर हा वन्यजीव, पशुपक्षी, जनावरे, शेती, आणि अन्य कामासाठी होतो त्या तलावात राजेरोसपणे सोडलं गेलेलं आहे. संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी लेखी – तोंडी तक्रार करूनही अद्यापही त्याच्यवर कोणतेही कार्यवाही झालेली नाही निंबोडी येथे गायरानातील ओढा आहे तेथे हे पाणी मोठया प्रमाणात साठलेला आहे.गायरानातील पशु पक्षी वन्यजीव व सजीवांना आता हे पाणी पिण्यायोग्य राहिला नाही कारखाना हा जाणूनबुजून करोडो रुपये कमवून सजीवांच्या व प्राण्यांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळत आहे.

बातमी कोट :

या संदर्भात म्हणून प्रांताधिकारी,तहसीलदार,आरोग्य अधिकारी व निंबोडी येथील ग्रामपंचायत यांना लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे जर लवकरात लवकर संबंधित अधिकारी व कारखाण्यावर कारवाई नाही झाली तर मी आमरण उपोषण करणार आहे.

सुरज सवाणे (ग्रामस्थ निंबोडी गाव )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *