BIG NEWS: माळेगावात दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत विषारी ताडी विक्रेत्यावर कारवाई करून अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील अवैद्य ताडी विक्री,गावठी दारू विक्री प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी,या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आज निषेध मोर्चा काढला. गावातील अवैध धंदे कायमचे बंद झालेच पाहिजे अशी घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.दोन दिवसांपूर्वी माळेगावातील रामनगर परिसरातील दोन युवकांचा विषारी ताडी पिल्याने
मृत्यू झाल्याची घटना घडली होती.राजू गायकवाड, हनुमंता गायकवाड अशी मयत झालेल्या युवकांची नावे आहेत.

त्यामुळे दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध कडक कारवाई व्हावी,ताडी तयार करण्यासाठी रसायन पुरवठा करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा,गावातील अवैद्य व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी जुजबी कारवाई उपयोगाची नाही तर त्या प्रकरणात तडीपारी कारवाई झाली पाहिजे,एक्साईज इन्स्पेक्टरवर कारवाई झाली पाहिजे,आदी मागण्या देखील मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या.

बेकायदा दारू विक्री, ताडी विक्री हा गुन्हा असताना देखील हा व्यवसाय राजरोसपणे कसा चालतो हा प्रश्न निर्माण होतं आहे.बेकायदा हातभट्टी दारू व ताडी विक्री चा व्यवसाय हा काही राज्य उत्पादन शुल्क चे अधिकरी व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने करत असल्याचे समोर येत आहे. हे बेकायदा व्यवसाय काही दलालांच्या माध्यमातून शासनाचा कर बुडवून मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा केली जातं आहे. याबाबत या मोर्चाच्या वतीने पुढील प्रमाने मागण्या करण्यात येत आल्या .
१) माळेगाव येथील मृत्यू प्रकरणातील आरोपी आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा….
२)माळेगाव येथील विषारी दारू प्रकरणातील गुन्ह्यांचा तपास दारू बंदी कृती समितीला माहिती देण्यात यावी.
३) बारामती तालुक्यातील सर्व गावातील बेकायदा दारूचे तडीचे धंदे बंद करा…
४) बारामती तालुक्यातील चालु असलेल्या अवैध धंद्याना कच्चा माल पुरवणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना आरोपी करा.
५)बारामती दौंड इंदापूर या तालुक्यातील बेकायदा ताडीच्या सर्व व्यवसायिकाकडून काही दलाल खंडणी गोळा करत आहेत.त्यांची चौकशी करून या टोळीवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करा. या संदर्भात मोर्चातील काही सदस्य गोपनीय जबाब द्यायला तयार आहेत.
६)दलालांच्या माध्यमातून खंडणी गोळा करणाऱ्या राज्यउत्पदान शुल्क च्या अधिकाऱ्यांचीं उच्च स्तरीय चौकशी करून कारवाई करा.
७) विषारी ताडी व दारूच्या माध्यमातून मृत्युमुखी पडलेल्या माळेगाव व झारगडवाडी येथील तरुणाच्या कुटूंबीयांना शासनाकडून मदत मिळावी.
८)बारामती इंदापूर दौंड तालुक्यातील दारू, मटका, झुगार, अशा सर्व अवैध व्यवसायावर कारवाई व्हावी

या मागण्या या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. जो पर्यंत या मागण्या मान्य होतं नाहीत तो पर्यंत दर ८ दिवसाला बारामती तालुक्यातील अनेक गावामध्ये मोर्चे, रस्तारोको सारखी आंदोलने करण्यात येणार आहेत याची नोंद प्रशासनानाने घ्यावी.असा इशारा मोर्च्याकऱ्यांनी दिला आहे.या मोर्चेकर्‍यांमध्ये मच्छिंद्र टिंगरे,अविनाश भोसले,रामभाऊ वाघमोडे,विक्रम कोकरे, संतोष वाघमोडे,विश्वास मांढरे,आशा नवले,अशोक सस्ते, अंजूताई वाघमारे,कल्पना जगताप,माया चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *