बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दोन दिवसापूर्वी माळेगाव येथे विषारी ताडी पिऊन दोघाचा मृत्यू झाला याप्रकरनाने बारामती तालुक्यात संतापाची लाट उसळली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या वरद हस्ताने हे बेकायदा धंदे राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे यांच्या निषेधार्थ आज माळेगाव येथे निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती मोर्च्याचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे, माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम कोकरे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भोसले, विश्वास मांढरे, संतोष वाघमोडे, नवनाथ वाघमोडे यांनी दिली