CRIME NEWS : वडगाव निंबाळकर येथील अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या प्रियकरासह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद ..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

वडगाव निंबाळकर येथील व्यक्तीच्या खून प्रकरणी दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या चार आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे जेरबंद पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.रोहित दत्तात्रय खोमणे, वृषाली वैभव यादव,(रा.वडगाव निंबाळकर,ता.बारामती, जि.पुणे ),शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सुर्यवंशी,वय. २३) व सागर सर्जेराव चव्हाण (वय २७, सर्व रा. वडगाव निंबाळकर,ता.बारामती) अशी या प्रकरणातील आरोपाींची नावे आहेत.

वृषाली यादव यांनी त्यांचे पती वैभव यादव हे बेपत्ता असल्याची तक्रार १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथके तयार करत तपास सुरु केला असता वृषाली हिने प्रियकर रोहित खोमणे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याचा निष्पन्न झाले.पोलिसांनी वडगाव निंबाळकर बस स्थानक परिसरात सापळा रचत या चौघांना अटक केली. चौकशीमध्ये त्यांनी वैभव यादव याला मारहाण करून पाडेगाव (ता.फलटण) येथे कालव्यामध्ये फेकून दिल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता लोणंद पोलिस ठाण्यात त्यासंबंधी अकस्मात मयत दाखल असल्याचे तसेच मयताची ओळख पटली असल्याचे दिसून आले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार सचिन घाडगे,अजित भुजबळ, राजू मोमीन, विजय कांचन,अजय घुले,धीरज जाधव,वडगावचे हिरामण खोमणे,पोपट नाळे,अमोल भुजबळ यांनी ही कारवाई केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *