मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पुढचे तीन दिवस ते याच रुग्णालयात उपचार घेणार आहेत. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध
केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.
२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल.या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये,अशा सूचना पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे ३ नोव्हेंबर शिर्डीतील सभेला हजर राहतील.त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबीरालाही शरद पवार उपस्थित राहतील.शरद पवारांच्या रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.