बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे ताडीचे अतिसेवन दोघांच्या जीवावर बेतल्याचा प्रकार दुपारच्या सुमारास घडला आहे.हनुमंता मारुती गायकवाड,वय ४० वर्षे राजू लक्ष्मण गायकवाड वय.३५ वर्षे, दोघेही ( रा. चंदननगर,माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) अशी दोघां मृतांची नावे आहेत.या युवकांसमवेत भय्यू चिनापा गायकवाड,सनी चिनाप्पा गायकवाड,भीमा कलाप्पा भोसले या तिघांनी देखील ताडीचे प्राशन केल्याने त्यांना देखील त्रास सुरू झाला होता,मात्र त्या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले असून,त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे आता माळेगाव पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ? यामुळे आता या ताडीविक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.यावेळी मयतांच्या कुटुंबातील लोकांचा आक्रोश हा मन हेलावन टाकणारा होता.या घटनेमुळे माळेगावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
या घटनेबाबत खेद व्यक्त करताना स्थानिक नागरिकांनी बेकायदेशीरपणी सुरू असलेल्या केंद्राबाबत दारू उत्पादन शुल्क विभागाच्या व पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.जास्त नशा येण्यासाठी ताडीमध्ये मोठया प्रमाणात केमिकल मिसळले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.अवैधपणे ताडीची विक्रीदरम्यान संबंधित ताडी विक्री केंद्र हे बेकायदेशीर होते.अवैधरित्या सुरू असलेल्या या केंद्राला कोणाचा आशिर्वाद होता ? असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित झाला आहे.ताडीच्या नमुन्यांची तपासणी होणार असून,ताडीच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू ओढावला असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्यांनी प्राशन केलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.तसेच नमुन्यांचा अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होईल.
बातमी चौकट :
माळेगावमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी असून याबाबत पोलिस कसून तपास करीत आहेत. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
किरण अवचर ( माळेगाव पोलीस निरीक्षक )