इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बेकायदेशीरपणे गायींचे व वासरांचे गोमांस विक्री करण्याच्या हेतूने घेवून जात असताना भिगवण पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.अमिर अमजार शेख,वय.२४ वर्षे, (रा.जी/२,तळमजाला, माहीम कॉम्पलेक्स,लाईन नं.१२,भाम देवनगर, कोंढवा,पुणे ) रसुल रफिक शेख,वय.२० वर्षे ( रा.शिंदेवस्ती,हडपसर, पुणे ) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२९,३४ सह,महाराष्ट्र प्राणी संरक्षण आधिनियम १९९५ चे कलम ५ (क) ९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई मंदार संभाजी शिंदे वय.३५ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.
भिगवन पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,दि.२८ ऑक्टो.रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण हद्दीत सोलापूर-पुणे हायवेवरून झायलो जीप मधुन बेकायदा गाई,वासरे, बैल या जनावरांचे कत्तल केलेले गोमांस हे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता,भिगवण पोलिसांनी पुणे-सोलापूर हायवेवर झायलो गाडी ताब्यात घेतली.ही कारवाई सागर हॉटेल समोर केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ५० हजार रूपये किमतींची गाई,वासरे,बैल या जनावरांचे कत्तल केलेले गोमांस व चार लाख रुपये किमतीची एक काळे रंगाची महिंद्रा कंपनीची झायलो जिप नंबर एम.एच.१२ एफ.पी.७२२७ असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.