बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी दिलेल्या पैशासाठी लहान भावानेच मोठ्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली. मोठ्या भावाला चप्पल व्यवसायाकरिता दिलेल्या पैशावरून विचारणा केली होती.यावरुन लहान भावाने रागाच्या भरात धारधार शस्त्राने भावाची हत्या केली. कल्पेश अरुण धुळप, वय.२६ वर्षे ( रा.रो.हौऊस नं.२, पेट्रोलपंप मागे,अमरसिंह कॉलनी,माळेगाव,ता.बारामती, जि.पुणे ) असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे.तर मंथन अरुन धुळप, वय.२३ वर्षे ( रा.रो.हौऊस नं.२, पेट्रोलपंप मागे,अमरसिंह कॉलनी माळेगाव,ता.बारामती,जि.पुणे ) असे मोठ्या भावाची हत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भा.द. वि.कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मृताची आई सुरेखा अरुन धुळप, वय.५० वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी माळेगाव पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार,कल्पेश आणि अरुण हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.मयत कल्पेश हा काहीही कामधंदा करत नसल्याने त्यांच्या आई वडिलांनी मागील आठवड्यात कल्पेशला नवीन चप्पल व्यवसायाकरिता १ लाख ४० हजार दिले होते.मात्र कल्पेश याने दिलेल्या पैशाची गुंतवणूक शेअर बाजारात केली होती. संशयित आरोपीने मयत मोठ्या भावाला दिलेल्या पैशाबद्दल विचारणा केली असता,मयत कल्पेशने व्यवसायासाठी दिलेले पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केले आहेत.
त्यामुळे आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत मी नंतर पैसे देतो असे म्हटंल्यामुळे आरोपी मंथन मोठ्या भावावर त्याच्यावर रागावला. त्यामुळे कल्पेश याने मथंन याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यामुळे,याचा राग मनात धरून मंथन याने घरातील चाकूने वार मानेवर व छातीवर वार करत खून केला असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.