दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पोलिसांकडून पोलीसी खाक्या दाखवत वठणीवर आणल्याचे आपण पाहत असतो.मात्र सध्या एका पोलिसालाच मारहाण झाल्याची धक्कादायक घडली असून,यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दौंड तालुक्यातील गोपाळवाडी रोड परिसरातील सरपंचवस्ती येथे पोलिसालाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी संशयित आरोपी ऋषिकेश उर्फ सोन्या सुरेश साळेकर (रा. सरपंचवस्ती, दौंड ),किरण आकडे (रा.बंगला साईड, दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश सदाशिव भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की,२४ ऑक्टो रोजी रात्रीच्या वेळी सरपंचवस्ती परिसरातील हॉटेल राजवाडा जवळ घटना घडली. रात्रीच्या वेळेस गोपाळवाडी हद्दीत गस्त घालित होते. त्यावेळी या ठिकाणी अंधारामध्ये पाच इसम रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून थांबलेले पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना,तुम्ही येथे का थांबला आहात अशी विचारणा केली असता आरोपी ऋषिकेश व किरण पोलिसांच्या अंगावर धावून गेले व तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी जाधव यांना दमदाटी वा शिवीगाळ केली.
तसेच त्यांनी फिर्यादीला मारहाण करून दुखापत केली व तेथून फरार झाले.दौंड पोलिसांनी दोन्ही आरोपीं विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे या कलमासह इतर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.