BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना ! जमिनीच्या वादातून ट्रॅक्टर अंगावर घालून ४ वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या देवकातेवर गुन्हा दाखल..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विकत घेतलेली जमीन परत देण्यासाठी वादावादी करुन त्यातून अंगणात बसलेल्या ४ वर्षाच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याचा खून केल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे घडला आहे.अबुजर जब्बार शेख,वय.४ वर्षे असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी जब्बार गफुर शेख,वय.३६ वर्षे ( रा. सरडेवाडी,जाधवपाटी,ता.इंदापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.यावरुन पोलिसांनी संशयित आरोपी जयप्रकाश नरहरी देवकाते ( रा. सरडेवाडी,जाधववस्ती,ता. इंदापूर ) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जब्बार शेख हे मजुरी करतात. त्यांनी २०२० मध्ये जयप्रकाश देवकाते यांच्याडून ४ आर जमीन नोटरी करार करुन विकत घेतली. त्याठिकाणी ते २०२१ मध्ये कुटुंबासह राहण्यास गेले. तेव्हा जयप्रकाश देवकाते याने तुम्ही घेतलेली जमीन परत दे, नाही तर मी तुझ्या कुटुंबाला बघुन घेतो,अशी वारंवार धमकी देत होता. तेव्हा फिर्यादी यांनी मी जमीन परत देतो, घेतलेले पैसे परत कर,असे सांगितले.त्याला तो तयार नव्हता. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याने जमिनीवरुन फिर्यादी यांच्याशी वाद घातला. फिर्यादी हे मंगळवारी सकाळी घरातील खोलीमध्ये चहा पित बसले होते.

अबुजर शेख हा त्यांचा ४ वर्षाचा मुलगा पडवीत चहा व बटर खात बसला होता.तेव्हा जयप्रकाश देवकाते हा ट्रॅक्टर घेऊन त्यांच्या अंगणात आला.त्याने पडवीत बसलेल्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला.ट्रॅक्टरचा आवाज ऐकुन फिर्यादी बाहेर आले असता त्यांचा मुलगा जखमी झालेला दिसला.देवकाते हा ट्रॅक्टर घेऊन तेथून निघून गेला व मोकळ्या शेतात लावून तो तेथून पळून गेला.शेख हे मुलाला घेऊन इंदापूर येथील रुग्णालयात आले असताना डॉक्टर तपासणीपूर्वीच मुलाचा मृत्यु झाला होता.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *