दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
यवत पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी कुरियर कंपनीच्या २४ लाखांवर डल्ला मारणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.ओंकार दिनकर जाधव,वय.२४ वर्षे रा.अकोळनेर,ता.नगर,जि.नगर ) अनिकेत गोरख उकांडे,वय.२३ वर्षे (रा.अकोळनेर ता.नगर, जि.नगर ) किरण रामदास गदादे,वय.२३ वर्षे ( रा. तांदळी,ता. शिरूर,जि.पुणे) तेजस मोहन दुर्गे, वय. २० वर्षे ( रा.म्हाडा कॉलनी,ता.बारामती,जि.पुणे गणेश बाळासो कोळेकर, वय.२० वर्षे (रा.तावरेवस्ती, सांगवी,ता. बारामती,जि.पुणे अशी बेड्या ठोकल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हा गुन्हा प्रेमराज उत्तम ढमढेरे ( रा.तांदळी,ता.शिरूर,जि. पुणे ) याच्या सहाय्याने केला असून,ढमढेरे हा फरार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,एकजण खासगी कंपनीचे कुरियर घेऊन एस.टी ने प्रवास करीत पुण्याकडे चालला होता.याच गाडीतील काहीजणांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. गाडी यवत येथे येताच दोन संशयितांनी उठून कुरियर बॉयला तु मुलींना का छेडतो असे म्हणत मारहाण करीत त्याच्याकडील कुरियरची बॅग लंपास केली.याप्रकरणी कुरियर बॉयने यवत पोलीस स्टेशन अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिली.या बॅगेत तब्बल २४ लाखांची रोख रक्कम असल्याचे कुरियर कंपनीचे मालक यांनी पोलिसांना सांगितले.या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते.आणि तब्बल १५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले.आणि २४/१०/२२ ला या टोळीला ताब्यात घेण्यात आले.या आरोपींना पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,विजय कांचन,अजित भुजबळ,अजय घुले, राजू मोमीन,दत्तात्रय तांबे,पोलीस नाईक बाळासाहेब खडके,पोलीस कर्मचारी धिरज जाधव,दगडू विरकर यांच्या पथकाने केलेली आहे.