बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
जलतरण तलाव उद्घाटनप्रसंगी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते.याबाबत खासदार सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या, बारामतीप्रमाणे इंदापूरला आम्ही स्पोर्ट काॅम्प्लेक्स उभे करत आहोत. या कामासाठी अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी ३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. राजेंद्र पवार यांनी त्यासंबंधी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.
त्यावर अजित पवार यांनी, बारामतीप्रमाणे सगळीकडे सोयी सुविधा झाल्या पाहिजेत, परंतु इंदापूरला बारकाईने हे काम बघणार कोण,असा सवाल उपस्थित केला.राजेंद्र पवार आठवड्यातून एखादा दिवस देऊ शकतील.पण उंटावरून शेळ्या हाकणे शक्य होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.आव्हान स्विकारा, टीम तयार करू, बारामतीप्रमाणे तेथेही सुविधा देऊ, असेही ते आवर्जून म्हणाले.