POLITICAL NEWS : तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतात,तरी देखील आम्ही इथपर्यंत पोहचलो ;अजित पवारांची तुफान फटकेबाजी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सुप्रिया सुळेंच्या किस्स्याचा धागा पकडून अजित पवार म्हणाले की,सुप्रियाने ओढ्याचा उल्लेख केला,तो ओढा नव्हता तर फाटा होता. तो ३३ नंबरचा फाटा होता, त्यात आम्ही पोहायचो. ऊन तापायला लागलं की पुन्हा बाहेर यायचो आणि मातीत झोपायचो राजूदादा तेच आठवण करुन देत होता कशी मजा यायची कसली मजा यायची आता काय मजा येतीय ते बघू. ? अजित पवार पुढे म्हणाले की, माझं तर काही सांगूच नका. मी तर पाण्याला एवढा घाबरायचो की लांबूनच सगळ्यांची मजा बघत बसायचो. पण, डबा बांधून वरूनच मला फेकून द्यायचे. मला भीती वाटायची, त्या डब्याचा दोर तुटला तर काय होईल.

पण,आमच्या वरिष्ठांना काही वाटायचं नाही…ते वरून खाली फेकून द्यायचे. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतात…त्यावर सभागृहात प्रचंड हशा झाला तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय..खरंच तुम्ही सर्वांनी आमचं कौतुक केलं पाहिजे.असा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (ता.२१ आक्टोबर) बारामतीत सांगितला. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या जलतरण तलावाचे उदघाटन आज बारामतीत करण्यात आले. त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या नेहमीच शैलीत जोरदार फटकेबाजी केली. त्यातून त्यांनी आपल्या सर्वांनाच चिमटे काढले.सुप्रिया सुळे यांनी पोहण्याचा किस्सा सांगितला. जलतरण तलावाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम असल्याने पोहण्याचा विषय आपसूकच सर्वांच्या भाषणात आला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, श्रीनिवास पोहायला शिकला आणि संध्याकाळी मला येऊन सांगितलं, ‘दादा मी पोहायला शिकलो.’ झालं रात्रभर मला झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी गेलो आणि पोहायलाच शिकलो. धाकटा भाऊ पोहायला शिकला आणि आपण बिनशिकता राहून कसं चालेल,असा किस्सा सांगताच हॉलमध्ये एकच हशा पिकला..भाषणाचा शेवट करता करता ते राजेंद्र पवारांकडे आले. आज तर काय जीनची पँट, टी शर्ट, बूट घातलेत…माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, पण मीच मोठा दिसतोय आणि हा लहान दिसतोय…आता राजूदादा आणि रोहित भाऊ भाऊ दिसतात…असं म्हटल्यावर सभागृहात पुन्हा हास्याच्या स्फोट झाला. तू एकटं एकटं सगळं करतोस…मला, सुप्रिया आणि रोहितला पण जरा सांग काय काय करायचं ते, आम्ही तुझं तू सांगशील ते सगळं ऐकू…’अस म्हणताच पुन्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *