BIG BREAKING : अजित पवारांना प्रादेशिक सहसंचालकांचा धक्का; माळेगाव कारखान्याला दहा गावे जोडण्याचा ठराव प्रादेशिक सह संचालकांनी फेटाळला..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ३० सप्टेंबर ला झालेल्या वार्षिक सभेत माळेगाव कारखान्याला नवी १० गावे जोडण्याच्या निर्णयावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती त्यानंतर अभूतपूर्व गोंधळ झाला.गोंधळात सत्ताधाऱ्यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले होते.त्यावेळी विरोधकांनी देखील प्रतिसभा घेत हा ठराव नामंजूर केला होता.याबाबत विरोधी संचालकाकडून साखर आयुक्तालयात दहा गांवे न जोडण्याबाबत दाद मागण्यात आली होती यावर साखर आयुक्तालयातील प्रादेशिक सहसंचालक डोईफोडे यांनी फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी पडले असून आता अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या संचालक मंडळाला मोठी चपराक बसली आहे.

या निर्णयानंतर विरोधी गटाच्या सभासदांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० गावे जोडण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला होता. या निर्णयाला प्रचंड विरोध करत सभासदांनी हा निर्णयाला विरोध केला होता. माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० गावे जोडण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला होता. या निर्णयाला प्रचंड विरोध करत सभासदांनी हा निर्णयाला विरोध केला होता.

कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी या निर्णयाविरोधात जोरदार आक्षेप घेतला. मात्र, संचालक मंडळाने अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णयाला मंजुरी दिली होती. त्याला विरोधी गटाच्या संचालकांनी तीव्र विरोध करून प्रादेशिक सहसंचालकांकडे दाद मागितली. त्यावर प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी संचालक मंडळाचा हा निर्णय फेटाळून लावत संचालक दहा गावे घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *