BIG BREAKING : विधवा महिलेची प्रॉपर्टी बळकावने आले अंगलट ; शिर्सुफळच्या माजी सरपंच,माजी उपसरपंच यांच्यासह कसब्यातील ऋतुजा ढवाण यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पतीच्या आजारपणात झालेल्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत,बँकेचे कर्ज मिळवून देतो असे सांगून, नंतर कर्ज मिळत असल्याने, ओळखीच्या लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन कर्जदाराला लुटणाऱ्या चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील एरंडोली येथील भिमाजी भिकाजी भंडारे यांनी फिर्यादीवरून अतुल हिवरकर, विश्वास आटोळे,सजय निंबाळकर व ऋतुजा ढवाण यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ५०६,३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियमचे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ जानेवारी २०२२ ते १७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली आहे.

विशेष म्हणजे यात एक शिर्सुफळच्या माजी सरपंच, माजी उपसरपंच यांचा समावेश असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादींच्या पतीचे आजारपणाने निधन झाले. असल्याने त्यांच्या उपचारासाठी नातेवाईकांकडून घेतलेल्या हात उसने पैशासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता भासत होती.त्यामुळे त्यांना त्यांच्या मालकीच्या रोहाऊसवर कर्ज हवे होते.त्यासाठी फिर्यादींच्या मुलाने लासुर्णे येथील गणेश थोरात यांना कर्जाची विचारणा केली असता, त्याने संशयित आरोपी संजय निंबाळकर व शिर्सुफळ येथील अतुल हिवरकर हे दोघे कर्ज मिळवून देत असल्याची माहिती दिली.

यावेळी थोरात याने संशयित आरोपींना तांबेनगर येथील जाधव यांच्या घरी आणले. तेव्हा या दोघांनी जाधव यांच्याकडून रो हाऊसची कागदपत्रे घेत संभाजीनगर येथील शुभम फायनान्सकडे दिली असल्याचे संगितले काही दिवसांनी निंबाळकर याने २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे, मात्र तेथील मॅनेजरला ५ लाख कमिशन द्यावे लागेल असे सांगितले.तेव्हा तेथील मॅनेजरला विचारणा केल्यानंतर मॅनेजरने आम्ही कोणतेही कमिशन घेत नाही.मात्र कर्ज कॅन्सल झाले असल्याची माहिती दिली.यानंतर निंबाळकर व हिवरकर यांनी दुसऱ्या एखाद्या बँकेत फाईल देऊन बघू असे सांगितले व दोन-तीन महिने झाल्यानंतर कर्ज मंजूर होत नसल्याने फिर्यादींच्या मुलाने निंबाळकर यांनी फाईल मागितली.त्यावेळी तुम्हाला गरज असेल,तर ओळखीच्या विश्वास आटोळे याच्याकडून १५ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

काही दिवसांतच विश्वास आटोळे याला घरी आणून तेथे रो हाऊसची कागदपत्रे दिली. तेव्हा तारण म्हणून रो-हाऊसची नोटरी करून द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर सुयश सहकारी गृहरचना संस्थेतील रो-हाऊस नोटरी स्वरूपात लिहून घेतला.अगोदर फक्त नोटरी म्हणून करून घेतलेल्या हाऊसचे थेट खरेदीखत या सर्वांनी करून घेतले.दस्त वाचण्यास न देता घाईगडबडीत सह्या घेतल्या.त्यानंतर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम म्हणून ३ लाख रुपये वैशाली संजय निंबाळकर यांच्या बँक खात्यात भरा असे विश्वास आटोळे यांनी सांगितले.मात्र त्यानंतर ऋतुजा ढवाण, संजय निंबाळकर व अतुल हिवरकर हे काही दिवसांनी रोहाऊसचा ताबा मागण्यास आले,तेव्हा हे रोहाऊस या सर्वांनी गहाण म्हणून न घेता थेट खरेदी म्हणून घेतले असून अहमदनगर जिल्ह्यातील भिमराव भिकाजी भंडारे याच्या नावावर केल्याचे जाधव यांच्या लक्षात आल्याने त्यानी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली.

असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे धडाकेबाज सहाय्यक निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *