गेल्या काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता.. आता नगरपालिका प्रशासनाला अजून कोणाचा बळी जाण्याची वाट बघणार का ?
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या महिन्याभरापासून बारामतीत डेंग्यूची साथ पसरली आहे.मात्र नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून स्वच्छतेच्या मुद्याकडे दुर्लक्ष झाल्याने बारामतीत डेंग्यूने रौद्ररूप धारण केले आहे.यामुळेच की काय.. बारामती शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांसह सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध होत असतात.स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात.मात्र आता बारामती नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे पोलीस प्रशासनाच्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्यांपूर्वी बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला होता.या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निधनाने अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले त्यांचे बाळ हे पोरक झालं आहे. असे असताना देखील बारामती नगरपालिका प्रशासन अजून कोणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
बारामती नगरपालिकेचे आर्थिक बजेट हे कोट्यांमध्ये ठरलेले असून यामध्ये आरोग्य विभागासाठी लाखो रुपये खर्चि केले जातात.मात्र बारामती नगर परिषदेला शहर पोलीस ठाण्यात औषधाची फवारणी करण्यात वेळ नाही का ? की नगरपरिषदेचे आर्थिक बजेट ढासळले का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.शहर पोलीस ठाण्याच्या बाजूच्या परिसरामध्ये बांधकामाचे काम सुरू असल्यामुळे व झालेल्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले असून त्याठिकाणी डासांची उत्पत्ती झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.
यामुळे आता बारामती नगर परिषदेने तात्काळ या ठिकाणी औषधाची फवारणी करणार का ? की अजून काही घडण्याची वाट पाहणार ? हे पाहण महत्त्वाचे आहे.यामुळे आता बारामतीचे कार्यक्षम लोकप्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार याप्रकरणी नगरपरिषदेला याबाबतच्या सूचना देणार का ? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
बातमी कोट :
बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे.याचा विचार करता बारामती नगर परिषदेने तात्काळ शहर पोलीस ठाण्याच्या आवारात औषधाची फवारणी करावी.अशी मागणी नाव न छाप अटीवर पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे.