POLITICAL NEWS : ओ…भास्कर शेठ तुम्ही आधी आणि आताही “नाच्या” चं काम चांगलं करता तेच करा भाजप नेत्या चित्रा वाघ यांची शिवसेनेच्या नेत्यावर जहरी टीका..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सध्या राज्यातलं राजकारण तापलं आहे.आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली होती यावर प्रतिउत्तर देताना चित्रा वाघ यांनी भास्कर जाधवांवर जहरी टीका केल्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवरती टाकला असून यामध्ये ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा..माझ्या नादी लागू नका, जेव्हा पूजा चव्हाण साठी मी लढत होती तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात कि तोंडाला लकवा मारला होता का ? असा सवाल देखील वाघ यांनी उपस्थित केला.

तसेच तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही आम्ही आमच्या जीवावर लढतो..त्यामुळे याद राखा
आमच्या बद्दल बोलताना दहा वेळा विचार करा..अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली.

नक्की काय म्हणाले होते भास्कर जाधव….

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल करत भास्कर जाधव म्हणाले की, संजय राठोड यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद दिलं त्याच भाजपने पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या कारणावरून संजय राठोड यांच्यावर सातत्याने टीका केली होती. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टीव्हीसमोर यायच्या आणि यांच्याबद्दल बोलायच्या. ‘उद्धव ठाकरे साहेब,आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायाची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या’, असं म्हणायच्या मग आज चित्रा वाघ कुठे आहेत ? आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल.

कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकार मध्येच संजय राठोड यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”,असंही भास्कर जाधव म्हणाले होते.तसेच उपरोधिकपणे टीका करताना, “आज त्या माऊलीला न्याय मिळाला असेल, तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल कारण त्याच चित्राताई वाघ ज्या पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत. ज्या संजय राठोडांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला त्यांनाच आज भाजपाचं सरकार येण्यासाठी सन्मानाने मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळाला,”असं भास्कर जाधव म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *