बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नाझरे धरण परिसरात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे नाझरे धरण हे शंभर टक्के भरले असल्याने बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीमध्ये ३५ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कऱ्हा नदीला महापूर आलेला आहे.यामध्ये बारामती तालुक्यातील अनेक गावातील घरामध्ये कऱ्हा नदीचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक नागरिकांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आलेल आहे..यात अनेक नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू आणि संसारपयोगी वस्तू या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. यामुळे प्रशासनाने या नागरिकांची व्यवस्था गावातील शाळांमध्ये केलेली आहे.
कऱ्हानदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्याने घरात पाणी शिरले असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.कऱ्हा नदीत झालेल्या अतिक्रमणाबाबत अनेक वेळा बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना तोंडी व लेखी स्वरूपात सूचना करण्यात आलेल्या असताना देखील, तहसीलदार यांच्याकडून अतिक्रमण धारकांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई न झाल्यामुळेच अनेकांच्या घरामध्ये शिरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.कऱ्हा नदी पात्रामध्ये झालेले अतिक्रमणाबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या.
यामध्ये महापुर आल्यानंतर बारामती तालुक्यातील गुणवडी व डोर्लेवाडी मधील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होण्याबाबत माहिती देखील प्रसिध्द केली होती.तसेच नदीपत्रात झालेल्या अतिक्रमणामुळे नद्यांची पात्र बदलून ते गावाच्या दिशेने सरकू लागले आहे भविष्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यास नद्यांचे पाणी नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या नागरिकांच्या घरात शिरणार यात शंका नाही अशी बातमी प्रसिद्ध होऊन देखील देखील केवळ तहसीलदार यांच्या निष्काळजीपणामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला असल्याने तहसीलदार तहसीलदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.यामुळे आता पुण्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे तहसीलदारांवर काय कारवाई करणार ? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.