महाराष्ट्र टुडे न्यूज नेटवर्क : विकास कोकरे
पुणे विभागातील १८ लाख ६२ हजार ६३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १९ लाख २७ हजार २४० झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या २४ हजार ७८ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ३९ हजार ८२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.०७ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ९६.६५ टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण ११ लाख ८ हजार ४२७ रुग्णांपैकी १० लाख ८१ हजार ८०९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ८ हजार ११८ आहे. कोरोनाबाधित एकूण १८ हजार ५०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.६७ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९७.६० टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण २ लाख ३५ हजार ६९६ रुग्णांपैकी २ लाख २२ हजार ८०७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ६ हजार ९९६ आहे. कोरोनाबाधित एकूण ५ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ९० हजार ६६१ रुग्णांपैकी १ लाख ८२ हजार ८४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार ८१५ आहे.कोरोना बाधित एकूण ४ हजार ७६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ८९ हजार ५७५ रुग्णांपैकी १ लाख ८० हजार ३८५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य ४ हजार २०१ आहे. कोरोना बाधित एकूण ४ हजार ९८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण २ लाख २ हजार ८८१ रुग्णांपैकी १ लाख ९५ हजार ५५४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १ हजार ६५० आहे.कोरोना बाधित एकूण ५ हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये २ हजार ५९० ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ८८१,सातारा जिल्ह्यात ५२९,सोलापूर जिल्ह्यात ४६९,सांगली जिल्ह्यात ४७५ तर कोल्हापूर जिल्ह्यात २३६ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण ३ हजार ६५८ आहे.पुणे जिल्हयामध्ये ७७२, सातारा जिल्हयामध्ये १२७२, सोलापूर जिल्हयामध्ये ६८३, सांगली जिल्हयामध्ये ६६३ व कोल्हापूर जिल्हयामध्ये २६८ रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण १ कोटी ४७ लाख ७२ हजार १३३ नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी १९ लाख २७ हजार २४० नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. २४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ९.०० वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)