BIG BREAKING : कऱ्हा नदीला आला महापूर ; नाझरे धरणातून तब्बल ३५ हजार क्युसेक्स पाणी सोडले … नदीकाठी राहणाऱ्यांना जलसंपदा विभागाचा सावधानतेचा ईशारा …!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….

नाझरे धरणातून पहाटे साडेपाच वाजता ३५ हजार क्यूसेक्स पाणी सोडावे लागले.बारामतीत पाण्याचा विसर्ग वाढू लागला असून बारामती शहरातून कहा नदी वाहत असल्याने जलसंपदा विभागाने सावधानतेची सूचना दिली आहे.नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कहा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे.

सध्या ३५२५० क्युसेक्स वेगाने कहा नदीत विसर्ग चालू आहे.त्यामुळे कहा उचंबळून वाहत असून करा नदीच्या पाण्यात वेग आहे. त्यामुळे कहा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *