BIG BREAKING : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व इंदापूर पोलिसांची संयुक्त कारवाई; गांजाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; कारवाईत तब्बल ८० लाखांचा मुद्देमाल जप्त ;


पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जिगरबाज कारवाई..

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांनी अमंली पदार्थाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतली असून,या कारवाईत टाटा कंपनीच्या हॅरीहर कारमधुन २१८ किलो २०० ग्रॅम असा तब्बल ८० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याप्रकरणी अमिर गुलाब मुलाणी ( रा.मळद ता. बारामती,जि.पुणे ) प्रकाश राजेंद्र हळदे,वय.३७ वर्षे ( रा. सातव शाळेजवळ,बारामती,ता. बारामती,जि.पुणे ) मुळ ( रा. मुखाई एस टी स्टँड जवळ ता.शिरूर,जि.पुणे ) खड्डु अश्रु परखड,वय.२९ वर्षे ( रा.पाहुणेवाडी ता. बारामती,जि.पुणे ) मुळ ( रा.लोणी,पारवडवस्ती ता. जामखेड,जि.नगर ) रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप,वय.३३ वर्षे ( रा.देसाई इस्टेट,क्रिडा संकुल मागे,बारामती ( मुळ रा.कौतुकनगर,पणदरे,सावतामाळी मंदिराजवळ ता. बारामती,जि.पुणे ) सुरज भगवान कोकरे वय.३२ वर्षे,( रा.हनुमान वाडी,पणदरे,बारामती जि.पुणे ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.या आरोपीं विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस.कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार काही इसम टाटा कंपनीच्या हॅरीहर कारमध्ये अंमली पदार्थाची वाहतुक करून घेवुन जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने,पोलीसांनी तात्काळ सरडेवाडी हददीत सापळा रचत एका आयट्वेन्टी गाडीमागे हॅरीहर कार जात असताना,पोलीसांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता,हॅरीहर कार न थांबता पुणे दिशेने गेल्याने पोलीसांनी तिचा पाठलाग करत सोनाई डेअरी जवळ गाडीचालकाला ताब्यात घेत चौकशी करत गाडीची पाहणी केली,यावेळी गाडीच्या डिक्कीत गांजा आढळून आला.यावेळी आय ट्वेन्टी कार नं. MH-05 CM-8500 व अल्टो कार नं. MH-18V-365 ही लोकेशनला असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही गाड्यांना ताब्यात घेत संशयित आरोपींकडे चौकशी केली असता, सदरील गांजा हा विशाखापट्टणम येथुन विक्रीसाठी आणला असल्याचे कबुल केले.कारवाईत गांजाची ११० पॅकेट्स अशी अंदाजे २१८ किलो २०० ग्रॅम वजानाचा आमली पदार्थ तब्बल ५४,५५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल व तीन गाड्या असा एकुण ८०,५५,००० रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,धनवे, माने,पोलीस उपनिरीक्षक देठे पाडुळे,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,अमित सिद पाटिल, सहा. फौजदार बाळासाहेब कारंडे,काशीनाथ राजापुरे,पोलीस हवालदार अभिजित एकशिंगे,स्वप्नील अहिवळे,शेळके, मोमीन,पोलीस नाईक एम.एन.थिगळे,सहा.फौजदार सतिश ढवळे,युवराज कदम,पोलीस नाईक बी.एम.मोहिते एस.बी.खान,पोलीस शिपाई व्ही.यु.काळे,व्ही.एस राखुंडे, विशाल चौधर,पोलीस शिपाई सुर्यवंशी यांच्यासह इंदापूर पोलीस ठाण्यातील पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *