CRIME NEWS : ग्रामीण पोलीसांची धडाकेबाजी कामगिरी ; शेतात छापा मारुन तब्बल साडे पाच लाखांचा गांजा केला जप्त..!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

फलटण ग्रामीण पोलिसांनी उपळवे येथील शेतात छापा मारत तब्बल ५ लाख २४ हजारांचा जप्त केला असून, याप्रकरणी शेतकरी हिंदुराव दादू लंभाते याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८, २० (अ),(ब), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना उपळवे येथील शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांनी तात्काळ नायब तहसिलदार सावंत,कृषिपर्यवेक्षक राऊत तसेच दोन पंच फोटोग्राफर,वजनकाटाधारक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यासह छापा मारत १३ किलो वजनाची तब्बल ५,२४,४०० रुपये किंमतीची गाजांची झाडे जप्त केली.यावेळी पोलीसांनी वेषांतर करुन तसेच भर पावसामध्ये संशयित आरोपीच्या शेतात जावुन वेगवगळ्या टीम तयार करुन सर्च ऑपरेशन राबवुन कामगिरी केली.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस नाईक अभिजित काशिद, वैभव सुर्यवंशी,अमोल जगदाळे, पोलीस कर्मचारी विक्रम कुंभार, महेश जगदाळे यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *