BIG BREAKING : आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोची चौकशीची करा ; भाजप नेते राम शिंदेंनी दिले साखर आयुक्तांना पत्र..!!


बारामती / कर्जत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली आहे.राम शिंदे यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.१५ ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

१५ ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. हा कारखाना १० ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच आज सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या माणीचे निवेदन दिले आहे. राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून याबाबतची माहिती दिली आहे.

“या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू करण्याचे शासनाचे आदेश डावलून नियमाचे उल्लंघन केले आणि आज १० ऑक्टोबर २०२२ रोजी बारामती ॲग्रो लि. शेटफळगडे (ता.इंदापूर जि. पुणे) कारखाना सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे कारखान्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांच्याकडे केली, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *