Ajit Pawar Speaks : काय बीकेसी काय शिवतीर्थ; कुणी काहीही करतंय,कशीही माणसं फोडतंय,लोकशाहीचा पार खेळखंडोबा चाललेला आहे : अजित पवार


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचा २०२१-२२ चा ६१वा गळीत हंगाम व गव्हाण पूजन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी अजित पवार बोलत होते.यावेळी ते म्हणाले, सध्याच्या सुरू असलेल्या राज्यातील गोंधळामुळे कुठलं सरकार किती दिवस टिकेल, हे अधिकाऱ्यांच समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू असून,याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे.सध्याच्या सुरू असलेल्या राज्यातील गोंधळामुळे कुठलं सरकार किती दिवस टिकेल, हे अधिकाऱ्यांच समजेना.

त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू असून,याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे.असा टोला देखील शिंदे -फडणवीस सरकारला लगावला.यावेळी ते सध्याच्या राजकारणावर बोलताना अजित पवार म्हणाले की,कोणी कोणाची माणसे फोडतंय. लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.साखर निर्यातीबाबत बोलताना पवार यांनी केंद्र सरकारने गेल्या वर्षी राबवलेले निर्यातीचे धोरण राबवावे तसेच सध्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७२ टक्के २६५ ऊस असून ८६०३२ उसाचे क्षेत्र वाढवले तर साखर उतारा जादा मिळून टनाला १५० रुपये जादा मिळतील, असे पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *