विकास कोकरे : महाराष्ट्र टुडे न्यूज नेटवर्क
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू असा गर्भित इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महा विकास आघाडी सरकार ला दिला आहे. इंदापूर शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना येथे भेट दिली या वेळी ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद जामदार,संचालक राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील,कांतीलाल झगडे,विलासराव वाघमोडे,
विलासराव वाघमोडे,दत्तात्रय शिर्के,भुषण काळे,आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची झालेली अटक त्याचा आम्ही निषेध करतो सुरुवात तुम्ही केली आहे त्यामुळे त्याचा शेवट आम्ही करू महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांना काय बोलतात.
त्यांच्या सीडी आमच्याकडे आहेत त्यामुळे जर त्या सीडी आम्ही ओपन केल्या तर हे एकमेकांवरच गुन्हे दाखल करतील अशी यांची परिस्थिती आहे. यापूर्वीही खा राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलत होते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलत होते हे सर्वांना माहीत आहे.यावेळी आशिष शेलार यांनी महा विकास आघाडी सरकार व विरोधी पक्षांवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की वीज कनेक्शन तोडले जात आहे शेतकऱ्यांना मंत्रालयासमोर आत्महत्या करावी लागत आहे.राज्यभरात काय चालू आहे ते सर्वांना माहीत आहे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही.हे घोटाळेबाज सरकार आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत ते काल ही नेते होते आणि आजही नेते आहेत.त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर निश्चितच मोठी जबाबदारी सोपविली जाईल.असे शेलार यांनी स्पष्ट केले.