बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत.बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांसह
माळेगाव साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ चा ६६ वा गळीत हंगामाला ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरुवात होणार आहे.या गळीत हंगामाची सुरुवात अजितदादांच्या हस्ते मोळी टाकून केला जाणार आहे.यासह सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि शेतकरी मेळावा होणार आहे.
यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे,माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे,पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे,बारामती दूध उत्पादक संघाचे चेअरमन संदीप जगताप,बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव टेंगले, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप,व्हाईस चेअरमन सागर जाधव यांच्यासह माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची प्रमुख उपस्थित असणार आहे.