DAUND NEWS : इंदापूर पाठोपाठ काही दिवसांतच यवतमधून देखील हवालाची २४ लाखांची रोकड लंपास..!!


यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पाटस गावातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुटण्यात आली होती.यांच्यानंतर मागील महिन्यात इंदापूर तालुक्यात देखील तीन कोटी रुपयांची हवालाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. आणि आता देखील यवत हद्दीमधून पुन्हा एकदा हवालाची तब्बल २४ लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना (दि.६) ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रज्योत रमेश शिंदे ( रा.कोराळे,पोस्ट बीबी,ता. फलटण,जि सातारा ) सध्या रा. काळाबादेवी मुंबई ) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी हे गुरुवारी सकाळी ८.०० वाजण्याच्या दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावरील यवत गावाच्या हद्दीत इंदापुर-स्वारगेट बस (एमएच 13/सीयु 7246) मध्ये बसलेले होते.यावेळी दोन अनोळखी इसम बसमध्ये चढले. त्यापैकी एकाने अंगात काळ्या रंगाचे जर्कींन घातलेले होते. त्यातील एका अज्ञाताने तु मुलींची छेड काढतो काय,असे म्हणुन आपल्याला हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर एकाने माझ्याकडील पार्सल बॅग पकडलेल्या हातावर लाथा मारून ती पार्सल बॅग हिसकावुन घेऊन बसमधुन पळ काढला.यामध्ये २४ लाख ३२ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम होती,असे शिंदे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *