BIG NEWS : बारामती जिंकण्यासाठी भाजपाची व्युहरचना ; केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या या आमदाराचा १३ ऑक्टोबरला बारामती दौरा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

एकीकडे विरोधकांचे ऐक्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.त्यातही जे मतदार संघ आजपर्यंत भाजपला जिंकता आले नाहीत,त्याठिकाणी भाजपने अधिक लक्ष देण्याचे नियोजन केले आहे.अशा मतदार संघांमध्ये आता बारामती मतदार संघाचा समावेश असून,बारामती मतदार संघाचं नेतृत्व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे करतात.याच बारामतीचा पाडाव करण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत.बारामती जिंकण्यासाठी भाजपने व्युहरचना केली आहे.

मध्यंतरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील बारामती दौरा करून गेल्या असून,त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांचा दौरा देखील भाजपचं संघटन वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांचा १३ ऑक्टोबर रोजी बारामती दौरा ठरला असून,पडळकर हे दौंड तालुक्यातील पाटस मधून सुरू करणार असून, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारामती मधील विविध ठिकाणी भेटी घेत बहुजन समाजाची सवांद साधणार आहेत.या दौऱ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता दौंड तालुक्यातील पाटस येथील मोटेवाडा कुस्ती केंद्राला भेट देणार आहेत.त्यानंतर बारामती एसटी कर्मचाऱ्यांचा एमआयडीसी येथे दुपारी १२ वाजता मेळावा व शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून,दुपारी एक वाजता राजेंद्र बरकडे निर्मित वाघर या मराठी चित्रपटाचे प्रमोशन पडळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी १.३० वाजता बारामती,इंदापूर,पुरंदर, दौंड येथील मेंढपाळांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर दुपारी २ वाजता पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली आहे. पाच वाजता डोर्लेवाडी येथे ओबीसी समाजाची विचार विनिमय बैठक होणार असून,दुपारी ४ वाजता मेखळी येथे बैठक,सायंकाळी साडेपाच वाजता झारगडवाडी येथे पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट व भटक्या विमुक्तांची बैठक असून, संध्याकाळी ६ वाजता बहुजन समाजाशी संवाद असे विविध कार्यक्रम दौऱ्यात समाविष्ट असणार आहेत.यानिमित्ताने आता भाजपा बारामती लोकसभा मतदार संघाला खिंडार पडणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *