बारामतीत शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन…


कमळाबाईचा सूक्ष्म बुद्धीचा नारू हा बॅनर ठरला चर्चेचा विषय

बारामती प्रतिनिधी दि :

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकेरी भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.ठिकठिकाणी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला,पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येत असून बारामतीत देखील नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात करत,कोंबड्या फेकत नारायण राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला.केंद्रीयमंत्री असलेले नारायण राणे हे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनजीवन धोक्यात आले असल्याचा आरोप शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक राजेंद्र काळे यांनी केला.नारायण राणेमुळे महाराष्ट्रात अराजकता माजली आहे.मुख्यमंत्र्यांन प्रति एकेरी भाषा वापरून राणेंनी संपुर्ण महाराष्ट्राचा अवमान केला असल्याचा आरोप देखील शिव सैनिकांकडून करण्यात आला आहे.

नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांना देखील धमकवण्याची भाषा वापरत,मी अगोदर तुमच्यावरही गुन्हा दाखल करील अशी दमदाटीची भाषा वापरून महाराष्ट्राची शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. असून माजलेल्या व्यक्तींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने त्वरित अटक करावी अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आले. तसेच या व्यक्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अराजकता माजली जाण्याची शक्यता आहे.त्यासाठी क्रिमिनल प्रोसीड कोड कलम १५१ व महाराष्ट्र स्टेट अमेंडमेंट सबक्लॉज (३) प्रमाणे पोलीस अधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारां अंतर्गत नारायण राणे यांना मेहरबान कोर्टाच्या परवानगीने २४ तासापेक्षा जास्त वेळ म्हणजेच कमीत कमी दहा दिवस कोठडीत ठेवून प्रतिबंधित करण्याची आवश्यकता असल्याच्या आशयाचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक ऍड.राजेंद्र काळे,उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे,तालुका प्रमुख विश्वास मांढरे,शहर प्रमुख वस्ताद पप्पू माने,युवासेना तालुका प्रमुख निखिल देवकाते पाटील,उपतालुका प्रमुख अनिकेत काटे,विभाग युवा अधिकारी गणेश करंजे,दीपक काशीद,संदीप तावरे,रंगा निकम,सर्वेश वाघ,सचिन कुचेकर,आदेश काळे शिवसेना महिला आघाडीच्या कल्पना काटकर,सुमिता खोमणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *