INDAPUR NEWS : हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा साजरा..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार दसऱ्याचा उत्सव इंदापूर व बावडा येथे नागरिक व कार्यकर्त्यासमवेत बुधवारी सायंकाळी उत्साही वातावरणात साजरा केला.यावेळी हर्षवर्धन पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी रत्नाई व भाग्यश्री बंगलो येथे आयोजित समारंभात उपस्थित शेकडो नागरिकांना विजयादशमीनिमित्त आपट्याची पाने देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा व साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण म्हणजे दसरा यावेळी हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला व वडिलधाऱ्यांचे आशीर्वादही घेतले. त्याचप्रमाणे जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनीही महिला भगिनी, कार्यकर्त्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *