इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील काझड गावातील किराणा व्यापाऱ्याची अन्न धान्याचा पुरवठा करतो असे आमिष दाखवत ऑनलाईन पद्धतीने २४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सचिन निवृत्ती नरुटे,वय ३० वर्षे ( रा.काझड,ता. इंदापूर, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.सुशीलकुमार त्रिवेदी, वंदना दायमा,भारत दायमा,राणी दायमा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत भारती विद्यपीठ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फिर्यादी सचिन नरुटे यांचे किराणा दुकान आहे. संशयित आरोपींनी त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने तब्बल २४ लाख ९ हजार रुपये घेतले होते.
पैसे दिल्यानंतर आरोपींनी नरुटे यांना अन्नधान्याचा पुरवठा केला नाही.नरुटे यांनी आरोपींकडे विचारणा केली.मात्र,त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नरुटे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.