बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सामाजिक सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर सक्षमपणे सांभाळण्यात पोलीस प्रशासन अग्रेसर मानले जाते.मात्र १०० चांगली कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामावर पाणी फेरण्याचे काम अशा लिंगपिसाट, अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.बारामती महंटले की पवारांची बारामती ही समोर येत असते.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय व चुकीची कामे करणार्यांना पाठीशी न घातला त्याच्यावर कारवाई करण्यात त्यांची ओळख आहे.मात्र असे असताना बारामतीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांकडून असे प्रकार घडत असताना,राज्याचे विरोधी पक्षनेते काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
बारामती तालुक्यातील वारंवार पोलीस अधिकाऱ्यांकडून महिलांबाबत असे प्रकार देखील समोर आले आहेत. काही प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली देखील झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.बारामती परिसरातील एका पोलीस अधिकाऱ्यानेच स्वत: एका महिलेला अश्लिल संदेश पाठवत पोलिसांच्या प्रतिमेला आणि नियमांना सुरुंग लावण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे.आता पुन्हा एकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हे मेसेज पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत.याबाबत पोलिसांना अजून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केलेली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.या घटनेची कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली.
या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने संबंधित महिलेला तिच्या व्हॉटस अॅपवर अश्लील मेसेज टाकून तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत.याबाबत आता वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात,याकडे सर्वांचेच लक्ष आहे.या लिंगपिसाट पोलीस अधिकाऱ्याच्या तावडीतून आम्हाला वाचवा आम्हाला मदत करा,अशी मागणी निनावी पत्राद्वारे एका वरिष्ठ पत्रकारांकडे करण्यात आली होती.या घटनेची कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली.याप्रकरणी संबंधित महिलेला या पोलिस अधिकाऱ्याने काही अश्लील इमोजीही पाठवलेले असून तिला आय लव्ह यू तसेच तुझा होकार आहे की नाही, ते एकदाच सांग. शेवटचं विचारतोय,असंही या मेसेजमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर हे मेसेज केले गेले आहेत.पोलिस खात्याच्या प्रतिमेशी ही बाब संबंधित असून आता वरिष्ठ बारामतीतील या पोलिस अधिकाऱ्याविरुध्द नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे