सांगली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसऱ्या मेळाव्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणापासून ते आरेवाडी देशाची राजधानी व्हायला पाहिजे असे विविध मुद्दे मांडत विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे. धनगर समाजाचा वैचारिक शत्रू हे बारामतीचे शदचंद्रजी पवार आहे अशी जहरी टीकाही पडळकरांनी केली आहे. सांगलीतील आरेवाडीमध्ये झालेल्या दसऱ्या मेळाव्यात गोपीचंद पडळकर बोलत होते.पवार यांनी कधी अहिल्यादेवीची जयंती केली आहे का ? असा सवालही पडळकरांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,धनगर समाजाचा वैचारिक शत्रू जर कोणी असेल तर ते बारामतीचे शरदचंद्र पवार असल्याचे पडळकर यांनी म्हणत दसरा मेळाव्यात आरेवाडी हे शक्तीकेंद्र बनलं पाहिजे अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.राजकारणामध्ये धनगर समाजाने पुढे आलं पाहिजे. बोललं पाहिजे तुम्ही शांत राहून चालणार नाही, मी वाटलं तर खाली बसतो दुसरं कुणी तरी बोला. पण सगळ्यांनी एकजूट करा असेही पडळकर म्हणालेत. पवार नावाच्या जातीनं आपलं रक्त शोषण करून पिलं आहे.
या राज्यात सर्वात जास्त मराठा जातीचे नुकसान करणारं कोण असेल तर शरद पवार आहे अशी जहरी टीका यावेळी पडळकर यांनी केली आहे.येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिरोबाचं बन ठरेल.आरेवाडी प्रेरणास्थान होऊ शकते म्हणून त्यांनी खोडा दसरा मेळाव्याला घातला होता. पवारांचं सरकार सत्तेवर होतं त्यावेळी ओबीसीची फाईल जाग्यावरून हलली नाही.मात्र आपलं सरकार सत्तेवर आल्यावर ७२ हजार ओबीसी वस्तीगृह मंजूर करून दिली.आम्ही दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही परत कधी येत नाही. कारण आम्ही भानगडी करायला येत नसतो असाही टोला पडळकर यांनी लगावला आहे.