बारामती प्रतिनिधी दि :
बारामतीयेथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ.विजयकुमार रामचंद्र भिसे यांची पुणे जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे सेक्रेटरी चंद्रसेन बी.राव यांनी दिल्लीवरुन प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप,अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे यांच्या शिफारशीनुसार पुणे जिल्हा काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी डॉ.विजय भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.विजय भिसे हे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय बारामतीचे अभ्यागत मंडळाचे सदस्य असुन , बारामती शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष , पुणे जिल्हा काँग्रेसचे पर्यावरण सेलचे माजी अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण सेलचे माजी उपाध्यक्ष व साप्ताहिक प्रविण व साप्ताहिक बारामती टूडेचे संपादक आहेत.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी डॉ.विजय भिसे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.पुणे जिल्हयातील काँग्रेसच्या सर्व वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे डॉ.विजय भिसे यांनी सांगितले.