JEJURI NEWS : जेजुरी मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने जालिंदर खोमणे यांची जेजुरी गावच्या खांदेकरी मानकरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड..!!


जेजुरी प्रतिनिधी : नवनाथ खोमणे

श्रीक्षेत्र जेजुरी मार्तंड देवस्थान ट्रस्ट आणी जेजुरी खांदेकरी मानकरी ग्रामस्थ यांचे वतीने रविवार दि. २/१०/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता छत्रीच मंदिर याठिकाणी जेजुरी दसरा पालखी उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील खांदेकरी व मानकरी यांना देखील उपस्थित राहण्याच्या सूचना देवस्थानच्या वतीने देण्यात आल्या होत्या.

यावेळी मिटींग घेऊन त्यामध्ये जालिंदर विठ्ठल खोमणे यांची सर्वाच्या एकमताने वतीने गाव खांदेकरी मानकरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संदिप जगताप, शिवराज झगडे,पंकज निकुडे,देवस्थानचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप,राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनाथ खोमणे हे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *